(मूल कविता– ऐसे रंग लगाना – अरुण प्रधान, पत्रकार) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “रंग लाव असा” …
■ रंग लाव असा – डॉ. प्रेरणा उबाळे
हे मना
हे रंगा
तुझं माझं
आहे एक नातं
एकीकडे रंग
एकीकडे मन
नातं आवडणारं.
रंग प्रेमाचा
भावतो मनाला
हे सखी,
रंग खेळू असा
मन रंगून जाईल
तुझं येणं आणि
रंगा-रंगाचं हसणं
नभाचा एक-एक थेंब
रंगांचे ढग बनून
बरसून जाणं
पळसाची फुलं होऊन
टोका-टोकावर
उगवून येणं
मनाचं रंगून जाणं
रंग लाव असा
सखी, रंग लाव असा (अनुवाद – डॉ. प्रेरणा उबाळे)