मेरी कविता’… मूल कवि-अरुण प्रधान), ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “माझी कविता

मेरी कविता’… मूल कवि-अरुण प्रधान), ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “माझी कविता

(‘मेरी कविता’… मूल कवि-अरुण प्रधान), ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “माझी कविता” …

माझी कविता

ही माझी कविता आहे
मी तिला जंगलात पाहिलंय….
ही जंगलाची कविता आहे
जंगलावर जेव्हा
भयाण, काळ्याकुट्ट अंधाराने आणि
काळ्या ढगांनी मारून टाकला होता
आपला भय आणि उदासीनतेचा डल्ला…
तेव्हा जमिनीखाली
फुटले होते जंगलामध्ये
दुर्वांचे अंकुर
दबलेले, आकसून घेतलेले,
आणि
डोळे बंद अवस्थेत.

मी जिला निवडलं होतं.
ती हीच कविता होती….
मी कविता पेरली नाही……
उगवण्यासाठीही प्रयत्न केले नाहीत…..
आणि कवितेला छाटून टाकले नाही
मी तिला बाजारात विकले सुद्धा नाही.
ती जंगलात उगवली….
जंगलाकडून ती शिकायची …..
आणि त्यालाही शिकवायची……
ती जंगलाची स्वतःची कविता होती…..
ती शिकली नव्हती मुखवटा घ्यायला…..
गरजांचे पांघरूण ती घेत नसे
मोहाच्या झाडावर फूल उगवताना पाहून
डौलदार व्हायची तिची चाल.
कोवळ्या उन्हात नाजूकपणे जाताना
गुणगुणायची आणि
वसंताच्या पहिल्या बहरात
रूप बदलून नवतारुण्य लेऊन
सार्‍या जंगलाच्या
रोम- रोमात भिनून जायची
वणव्याप्रमाणे.
आणि
मग सगळं जंगलच
जंगलातील सर्व लोकदेखील
गुणगुणायला आणि नाचायला लागायचे,
आणि कविता खोल जाऊ लागायची
कधी उसळी घ्यायची आणि
कधी ती स्वत:चा परीघ वाढवायची

तिला मी जंगलामध्ये पाहिलंय
ही जंगलाची कविता आहे
ही माझी कविता आहे……
होय ….
………
ही माझी कविता आहे….. (अनुवाद – डॉ. प्रेरणा उबाळे)

डॉ. प्रेरणा उबाळे (लेखिका, कवयित्री, अनुवादक, आलोचक, सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत), शिवाजीनगर, पुणे-411005, महाराष्ट्र) @Dr.PreranaUbale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *