मूळ कविता 'ये नज़्मकार को हुआ क्या है' - पत्रकार अरुण प्रधान) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “कवीला हे झालंय काय

मूळ कविता 'ये नज़्मकार को हुआ क्या है' - पत्रकार अरुण प्रधान) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “कवीला हे झालंय काय

(मूळ कविता ‘ये नज़्मकार को हुआ क्या है‘ – पत्रकार अरुण प्रधान) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “कवीला हे झालंय काय ” …

कवीला हे झालंय काय … – डॉ. प्रेरणा उबाळे

कवीला हे झालंय काय
या काळोख भरलेल्या जगात
काय वेगळे आहे शोषणामध्ये !
प्रतिष्ठा तर रोजच धुळीला मिळतेय
भुकेने तळमळणं रोजचंच
आणि अपमान-तिरस्कार सुद्धा रोजचेच
मंदिर-मशिदी आपापल्या जागेवर
पावलं आहेत नेहमीच्या मार्गांवर,
सतारीचा आवाज मंद तर झाला नाही?…
कि आवाज आता गप्प झालाय ?…
आयुष्य ठरलेलं आहे रोजचंच
मुठी वळलेले हात
शाईहून काळीकुट्ट बोटं
आणि लोकशाही आहे देशामध्ये
बैठका होतात दररोज
म्हणतात लोकशाहीत शांतता आहे सगळीकडे
आणि कवीला हे झालंय काय…. (अनुवाद – डॉ. प्रेरणा उबाळे)

डॉ. प्रेरणा उबाळे (लेखिका, कवयित्री, अनुवादक, आलोचक, सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत), शिवाजीनगर, पुणे-411005, महाराष्ट्र) @Dr.PreranaUbale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *