‘कवि और कविता (http://कवि और कविता) श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे की मराठी कविता “नुसतं डोळ्यांत पाहून” …

नुसतं डोळ्यांत पाहून….डॉ.  प्रेरणा उबाळे

मनातलं ओळखण्यासाठी
झिरपावं लागतं मनात
कारण डोळ्यांत डोळे घालून खोटे बोलणारे
असतात अधिक
म्हणून
नुसतं डोळ्यांत पाहून मनातलं ओळखता येत
नसतं

मनातलं ओळखण्यासाठी
झिरपावं लागतं शब्दा-शब्दातल्या भावनेत
कारण गोड-गोड बोलत
केसाने गळा कापणारे असतात अधिक
म्हणून
नुसतं डोळ्यांत पाहून मनातलं ओळखता येत
नसतं

मनातलं ओळखण्यासाठी
झिरपावं लागतं वागण्या-बोलण्यात
कारण ठरवून-उमजून
पाठीत खंजीर खुपसणारे असतात अधिक
म्हणून
नुसतं डोळ्यांत पाहून मनातलं ओळखता येत
नसतं

तुझ्या डोळ्यांनी शिकावी
आता जगाच्या डोळ्यांची भाषा
ओळखावा- पारखावा विश्वास
जाणून घ्यावं प्रेम
ओढ किती मायेची

होऊन शहाणं
रुक्ष डोळ्यांनी
व्हावे पुन्हा वृक्ष
म्हणेल मग जग
नुसतं डोळ्यांत पाहून कळतं सारं
नुसतं डोळ्यांत पाहून कळतं सारं … डॉ. प्रेरणा उबाळे (09 जून 2024)

डॉ. प्रेरणा उबाळे (लेखिका, कवयित्री, अनुवादक, सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत), शिवाजीनगर पुणे-411005, महाराष्ट्र)

1 thought on “नुसतं डोळ्यांत पाहून – डॉ. प्रेरणा उबाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *